मल्ल प्रेमयुद्ध - भाग 2

  • 10.3k
  • 7.6k

मल्ल - प्रेमयुद्ध संध्याकाळ झाली होती. रायगाव गावात जल्लोषात क्रांतीची मिरवणूक सुरू होती. तालुक्याच्या गावापासून 4 किलोमीटरवर एक छोटं गाव होत. निसर्गाने नटलेलं.... त्याच छोट्या गावातली क्रांती आज महाराष्ट्रात नाव कमवत होती. क्रांती ओपन जीपच्या मध्ये उभी राहिली होती. पाराजवळ गाडी आली आणि चिनू पटकन गाडीमध्ये येऊन बसली. क्रांती तिच्याबरोबर बोलत नाही. " ये तायडे रागवलीस? तुला म्हाईती हाय ना मला तुला कुस्ती खेळताना बघताना लय त्रास व्हतो म्हणून मी अली न्हाय." क्रांती तिच्याकडे बघत सुद्धा नव्हती. "तायडे बोल ना ग... तू जिंकणार याची खात्री व्हती मला पण भीती वाटते खेळात जरी लागले तरी... प्लिज ग बोल की..." क्रांतीने तिच्याकडे