मल्ल प्रेमयुद्ध - भाग 1

(11)
  • 20k
  • 1
  • 14.5k

मल्ल - प्रेमयुद्ध डांगेमैदानात नुसता धिंगाणा सुरु होता. चारही बाजूला पब्लिक आरोळ्या देत होते. क्रांतीने मॅटवर रत्नाला चितपट केले होते. नेहमीप्रमाणं या हि वर्षी क्रांतीने तिच्यापेक्षा जास्त वजनाच्या रत्ना देवरे या मुलीला खेळात शक्ती आणि युक्तीने नामोहरण केले होते. क्रांतीचा श्वास फुलाला होता. शिट्टी वाजल्यानंतर तीने रत्नाला सोडले होते. इतके दमूनसुद्धा विजयाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर सर्वानाच दिसत होता. गोऱ्या चेहऱ्यावर लाली आली होती. रत्नाने क्रांतीला मिठी मारली होती. रत्ना क्रांतीची जिवलग मैत्री होती. हा... पण खेळात प्रतिस्पर्धी होत्या नक्की. रत्नाने तिच्या युक्तीचे कौतुक केले. 'बाजी मारलीस म्हंटल. नाहीतर तुझ्याशिवाय मला हरवणारी अजून कोण असणार.' पंचांनी तिचा हात पकडला आणि उंचावून