सावध - प्रकरण 9

  • 5.8k
  • 1
  • 3.3k

सावध प्रकरण ९ टॅक्सी करून ते पुन्हा आपल्या ऑफिस पाशी पोहोचले इमारतीच्या तळमजल्यावर बसलेल्या वॉचमनला पाणिनी ने विचारलं. “मला कोणी भेटायला आल होत?” “छे: कोणी सुद्धा नाही.” वॉचमन उत्तर दिलं सौम्या आणि पाणिनीने एकमेकांकडे बघितलं. “सौम्या आपण कनक ओजसच्या ऑफिसमध्ये आधी जरा नजर टाकू.” कनक चं ऑफिस पाणिनीच्याच ऑफिसच्या मजल्यावर होतं. आपल्यासमोर फायली आणि फोन घेऊन कनक कामात गढला होता. “काय म्हणतोयस कनक? कसं काय चाललंय?” “छान तू सांगितलेलं काम चालू केलं. तुला हवी असलेल्या रिव्हॉल्व्हरची माहिती मिळाली आहे.” कनक म्हणाला, “बऱ्याच जणांना ती रिव्हॉल्व्हर विकली गेल्ये. म्हणजे एकमेकांकडून हस्तांतरित झाली आहे. सगळ्यात शेवटची विक्री उदक प्रपात कंपनी याला झाली