पैसा !!कुठे घेऊन जाणार आहात हा पैसा ! शेवटी सगळं इथेच तर ठेवायचं आहे.... खरच ? हे वाक्य जितकं सहज बोलल जात तितकं सोप आहे... ? साधं कोणी गरज म्हणून सुद्धा १० रुपये खिशातून काढून द्यायला विचार करतं.. आणि तेच लोक म्हणतात पैसा काय तुम्हाला चाटायचा आहे का ? भूक लागते तेव्हा अन्नच लागत पोट भरायला. अहो पण तेच अन्न विकत आणायला पैसाच लागतो.. दुकानदार म्हणत नाही “भूक लागली आहे का ? हे फुकट घेऊन जा.” ह्या जगात जो तो फक्त स्वत : चा विचार करतो... करतो ना ?“ मी निधी देशमुख..” साधी सरळ मेहनत करून करियर..अहह ना ना.. नोकरी