चंपा - भाग 7

  • 9k
  • 6.2k

चंपा फ्रेश होऊन खाली आली तर राम फ्रेश होऊन कॉफी घेत बसला होता. “तुझ्यासाठी कॉफी मी करणार होते.” तिच्यासाठी रामने भरलेला कॉफीचा मग उचलत बोलली. “मारिशा सॉरी…” “आता काय झालं? काहीतरी नक्कीच बिनसलंय?” “मी अस बोलायला नको होतं… तूला वाईट वाटले ना?” मारिशा मोठ्याने हसली आणि म्हणाली, “मला का वाईट वाटेल… तुला मी आज ओळखते का? “ मारिशा त्याच्या जवळ गेली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि कॉफीचा एकेक सिप घ्यायला लागली. राम सावरला… ”चल खूप दमलोय झोपतो.” तो उठला. आणि तडक रूम मध्ये निघून गेला रामचे असे निघून जाणे तिला खटकले. तिला कळेचना हा असा का वागतोय? मारीशा किचनमध्ये गेली.