भेटली तू पुन्हा... - भाग 13

  • 7.8k
  • 1
  • 5k

    आदि अनुला घेऊन घरी आला. ती अजून ही घाबरलेली होती. तिला आदि सोबत अस येताना पाहून आई थोडी घाबरली व गडबडीने दरवाज्याकडे गेली.   "काय झालं अनु बेटा?" आई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत काळजीने विचारत होती.     "आई आधी बसु दे तिला, मग बोलू आपण" आदि आईला म्हणाला.     "हो, ये ये बसा दोघे ही, मी पाणी घेऊन येते तुम्हाला" अस म्हणून आई किचन मध्ये निघून गेली.     "अनु, शांत हो आता घाबरू नको, त्याला साहिल बघून घेईल" आदि तिला समजावत बोलला.     "हम्म" तिने फक्त हुंकार भरला.     तिच्या डोळ्यात पाणी थांबत