साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 3

  • 7.1k
  • 3.3k

पण निशीचेही लक्ष रुद्रकडेच होते. पण ती सरळ सरळ तसे त्याला दाखवत नव्हती. त्याला पाहून आतून ती खुश झाली होती. तिला एकदम फ्रेश फ्रेश वाटू लागले.अचानकच वारेची मंद झुळूक चेहऱ्यावरून गेल्यासारखी तिला भासू लागले. कुठेतर संगीत वाजू लागले आणि त्यावर तिचे पाय आपोआप थिरकत आहेत असा भास तिला होऊ लागला.पण तिला जसे जाणवले की ती कोणत्यातरी सुप्त स्वप्नामध्ये हरवली आहे तेव्हा तिने पुन्हा स्वतःला सावरले आणि कामावर लक्ष केंद्रित करू लागली. रुद्रने एकदा निशीकडे पाहिले पण ती तिचे काम करत आहे हे पाहून तो मनामधून चिडला आणि तिथून निघून गेला.रुद्रची कस्टमरसोबत मीटिंग होती म्हणून तो बाहेर जाणार होता. त्यामुळे तो