चंपा - भाग 3

  • 11.3k
  • 8.2k

चंपा दुसरा दिवस उजाडला राम चंपाचा विचार करत रात्री उशिरा झोपला त्यामुळे सगळ्याच गोष्टीला उशीर झाला. सिद्धार्थला उठवले सिद्धार्थ घरी गेला आणि मी ऑफिसमध्ये… ऑफिसमध्ये पोहचायला अकरा वाजेल. चंपाकडे ऑफिसची चावी नव्हती. मी गाडी ऑफीससमोर लावली. चंपा दारात उभी होती. “सॉरी उशीर झाला. खूप वेळ येवून उभी राहिलीस का?” “नाही... साडेदहाला आले मी .” अर्धातास हि रस्त्यावर उभी होती. मला वाईट वाटले. “एक्स्त्रीमली सॉरी !” “नो प्रोब्लेम सर.” तेवढ्यात मागून आवाज आला. “काय साहेब? साडेदहाला मला मालकांनी हाकलून लावले पाहिलं राम साहेबांच्या हापिसात टेबल खुर्ची पोस्त कर आणि तुमीच उशिरा.” “गणपत तू कधी आलास?” “मी पण ह्या बाई आल्या तेंव्हापासून