साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 2

  • 8k
  • 3.9k

निशीचा चेहरा उतरला.. ती स्वतःशीच पुटपुटली.. "इतके छान प्रेझेंटेशन देऊन ही याला काहीच नाहीये.. पण तिला आतून एक प्रश्न पडला.. मी इतकी उशिरा येऊन ही रूद्र काहीच का बोलला नाही..? मला रूद्रचा इतका राग येतो असे मी सर्वांना दाखवते पण प्रत्यक्षात का मी रूद्रवर रागऊ शकत नाही..?? कितीही ठरवले तरी त्याला दुखावू शकत नाही..?? का माझ्या मनामधून त्याचा विचार जात नाही..? असे का वाटते रूद्र आणि माझे आधीपासूनच काही तरी नाते आहे..?? का..? का..?"निशी विचार करतच तिच्या डेस्कवर जाऊन बसली. तेव्हा तुक्स तिच्याजवळ येत म्हणाली, "वा... काय प्रेझेंटेशन दिली तू. सिरयस्ली इट वॉज ॲसोम. मी तर फक्त पाहतच राहिले तुझे