सावध - प्रकरण 4

  • 6.4k
  • 3.9k

प्रकरण ४ मायरा आणि आदित्य कोळवणकरला आपल्या ऑफिस मधे बसवून पाणिनी पटवर्धन पुन्हा मायरा कपाडिया च्या अपार्टमेंट जवळ आला. आत जाण्यापूर्वी त्याने सौम्याला फोन लावला.“ काय चाललंय तिकडे? अजून किती वेळ काढू शकतेस तू? ” पाणिनी ने विचारलं.“ या क्षणापासून पंधरा मिनिटांची हमी देते तुम्हाला.” सौम्या म्हणाली.“ छान. तेच मला जाणून घ्यायचं होतं.”“ काळजी घ्या सर.”“ नाही सौम्या.आम्लेट करायचं तर अंडं फोडायला लागणारच. बर मी बंद करतोय फोन.”पाणिनीकडे तिच्या फ्लॅट ची किल्ली होतीच तरीही त्याने दक्षता म्हणून बेल वाजवली.दोन तीन वेळा वाजवूनही आतून दार उघडले गेले नाही,तेव्हा त्याने आपल्या जवळच्या किल्लीने दार उघडलं.आत गेला दार बंद केलं. आधी आला त्या