सावध - प्रकरण 1

  • 15.2k
  • 9.3k

सावधप्रकरण १ दहा हजार बक्षीस ! या महिन्याच्या ३ तारखेला द्वीप कुंड चौक आणि भीष्म चौक वर आपल्या गाडीचा टायर बदलत असणाऱ्या व्यक्तींनी फोक्स व्हॅगन आणि गडद रंगाच्या सिटी होंडा यांची झालेली धडक पाहिली असेल आणि त्यातील सिटी होंडा चे अचूक वर्णन कनक ओजस याच्या गुप्तहेर कंपनीला पोस्ट बॉक्स नंबर ७७७ ला केले, तर त्या व्यक्तीला दहा हजार चे बक्षीस मिळेल.अपघात पाहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की टायर बदलणाऱ्या व्यक्तीने धडक देणाऱ्या सिटी होंडा चा नंबर टिपून ठेवला आहे,परंतू अँब्यूलन्स येण्यापूर्वी ती व्यक्ती टायर बदलून झाल्यामुळे निघून गेली होती.त्यामुळे आता त्याच्या कडून सहकार्याची अपेक्षा आहे.कनक ने पाणिनी च्या समोर पेपर टाकला.