हैवान अ किलर - भाग 3

  • 5.6k
  • 3.1k

लेखक -जयेश झोमटे कथा : रामचंद द हायवे किलर ..! ... नाव देवाच , पन देह .. सैतानाच .. भाग 3 एक काळ्या रंगाचा निर्मनुष्य लांबच्या लांब पसरलेला हायवे दिसत आहे . हायवेच्या दोन्ही बाजुला दुरदर पर्यंत पसरलेली तप्त वाळु दिसत आहे. हवा सूटू लागली की ती तप्त वाळू सोनेरी चमकील्या रंगासहीत हवेत उडत आहे. त्या वाळवंटा मधोमध एक दुर पर्यंत सरळ रेषेत पुढे गेलेला- दोन सरळ पट्टयांचा हायवे दिसत आहे.त्याच हायवेच्या रस्त्यावरुन एक सोनेरी रंगाचा खवळेधारी सरडा,ज्याचे डोळे जरासे सोनेरी, डोक्यावरुन खाली शेपटीच्या शेवटच्या टोकापर्यंत टोकदार काटे शरीरातुन उगवलेले दिसत होते. हाच सरडा हळूच हायवेच्या एकाबाजूने दुस-या बाजुला जाण्यासाठी