इश्क का रंग सफेद पिया... - 1

  • 7.5k
  • 1
  • 2.6k

मी सिया..... " तुझं नाव काय आहे??", त्याने कडक आवाजात विचारलं.. तशी माझी बोबडीच बंद झाली.. काय बोलावं सुचेना.. आधीच हे पोलिस स्टेशन पाहून माझ्या मनात धडकी भरली होती.. मला तर माहित पण नाही की काय चालू आहे.. आणि हे पोलिस मला असे रागात का पाहत आहेत?? " मी विचारलं तुझं नाव काय आहे??", त्याने जरा ओरडून रागात विचारलं.. " सि.. सिया.. ", मी घाबरुन म्हणाले.. " वय किती?? ", तोच पुन्हा भितीदायक आवाज.. "ए.. एकोणीस... ", मी माझ्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाली... " एवढं लहान वय आहे तुझं.. आणि अशी कामं करत फिरतेस ", तो पोलिस एकदाच चवताळून ओरडला..