Unexpected Love - 3

  • 8k
  • 4.5k

रूद्र आर्या ●●□□●● सकाळी रूद्र त्याच्या रोजच्या वेळेवर उठतो.. आणि नेहमीप्रमाणे त्याच्या जिम मध्ये जायला निघतो... तो खाली येतो आणि जिम च्या दिशेने जातच असतो की त्याला गार्डन कडे जाणार्या स्पेस मध्ये असलेल्या झोक्यावर बसलेली आर्या दिसते... सकाळचे पाच वाजत असताना ही इथे काय करते असा प्रश्न त्याच्या डोक्यात येतो . अजुन पूर्णपणे सकाळ झालेली नसते. जी मुलगी 9 वाजल्या शिवाय उठायची नाही ती 5 वाजता उठलेली म्हणून त्याला पचायला जरा जड जात होतं... तो तसाच परत एकदा तिला निरखून बघतो.... आर्या एकटक बाहेर पाहत असते.. डोळे मिटून थंडगार मंद वारा चेहर्यावर झेलत होती.. हळु हळु झोका पायाने हलवत होती..