स्वप्नस्पर्शी : ११ पहाटवारा अंगाभोवती फिरू लागला, तशी त्या सुखद वाऱ्याने राघवांना जाग आली. मावळतीला आलेले चंद्र चांदण्या दूर जात आहेत असं त्यांना वाटून गेलं. खालचं हिरवं जग, रात्रभर चंद्र चांदण्यांचा प्रकाश पिऊन त्या तेजाने विलसतय असं भासत होतं. हळूहळू दिशा उलगडून आपले रंगाचे पट खोलू लागल्या. मग पक्षीही आकाशी झेप घेत किलकिलाट करू लागले, तसे