ती सगळी प्रेत त्या तिघांच्या अवतीभवती गोळा होवू लागतात. तस त्यांना काय कराव हेच सूचेनास होत. एकतर वीरला पाहून सगळ्यांच हृदयच हळहळत होत. त्यात ते पुस्तक आणि शस्त्र दोन्हीही त्यांच्यापासून दूर झालेल. तरीही ते एकमेकांकडे बघत एकमेकांना धीर देतात. आणि इशारा करत अधिराज अनुश्रीला खुणावतो. अनुश्री लागलेल्या जख्मेवरची पट्टी काढते तस त्यातल्या जख्मेवरची खपली दिसते. त्या प्रेतांना ते पाहून भलताच आनंद होतो. तिथे असणारी सगळीच प्रेत अनुश्रीच्या दिशेने येवू लागतात ते पाहून अधिराज कावेरीला खुणावतो ती तशीच त्या पुस्तकाकडे वळते आणि अधिराज त्या शस्त्राकडे जावू लागतो अनुश्री जोरात वेगाने पळत असते. ती पळत पळत तिथून बाहेर पडते. ती प्रेतही तिच्या