मातृदिन विशेष

  • 5.3k
  • 1.9k

मातृ दिन प्रत्येकाच्या हृदयात आपल्या आईसाठी एक हळवा कोपरा असतोच असतो.ज्या व्यक्तींना आईवडिलांचा सहवास त्यांच्या वयाच्या पन्नाशी-साठीनंतरही मिळत रहातो त्या व्यक्तींचा मला खरंच खूप हेवा वाटतो! अशी माणसं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे खूप भाग्यवान असतात! आपल्याकडे एक जुनी म्हण आहे "माणसाने नकटं व्हावं;पण धाकटं होऊ नये". माझ्या दृष्टीने या म्हणीचा उगम अशा धाकट्या असलेल्या व्यक्तीच्या व्यथेतून झाला असावा, कारण आई आणि वडिलांचा सर्वात कमी सहवास धाकट्याला मिळतो! माझ्या सहा बहीणभावंडातले मी शेंडेफळ!कधी कधी सहजच मनात विचार येतो की जर पन्नास साठच्या दशकात मर्यादित कुटुंबाचा फंडा असता तर?... ....तर, कदाचित माझा जन्मच झाला नसता!... तर, मी माझ्या पालकांचे शेवटचे अपत्य होतो....