साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 1

  • 14k
  • 6.2k

निशी थोडी घाईमध्येच होती.. आधीच तिला उशीर झाला होता.. त्यामध्येच तिची आई तिच्यामागे नास्ता करून घे म्हणून मागे होती... पण निशीला ऑफिसला जायची घाई झाली होती.. एक तर आज महत्वाची मीटिंग.. त्यामध्ये त्या मीटिंगचे प्रेझेन्टेशन निशीच करणार होती.. यामुळे तिला एकच घाई लागली होती.. कशीबशी ती घरामधून बाहेर पडली.. समोर मिताची आई, जानवी उभी होती.. निशी मनामध्ये विचार करतच होती.. "आता काकी माझे चांगले पंधरा वीस मिनिटे तर निवांत घेणार.. इकडच्या तिकडच्या चार गोष्ठी सांगत बसणार.. आणि मी नेहमीसारखी मान हालवत हालवत त्यांना प्रतिसाद देणार.." असे विचार करतच होती की जानवी काकींनी निशीला हाक मारलीच... जानवी काकी- अरे...! निशी बेटा,