रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 67

  • 2.8k
  • 930

अध्याय 67 भरत-शत्रुघ्न ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लहूला पकडून नेल्यामुळे जानकीचा खेद : शत्रुघ्न घेवोनि गेला लहुया । बांधोनि जानकीच्या कनिष्ठ तनया ।ऐसें ऐकोनि जनकतनया । शोकार्णवीं बुडाली ॥१॥ऋषिकुमर सांगती सीते । लहूनें युद्ध केलें पुरुषार्थे ।संतोषविलें पितृव्यातें । आपुलेनि भुजबळें ॥२॥शेवटीं बंधन पावूनी । आम्हांदेखता रथीं वाहूनी ।पुत्र नेला वो सुलक्षणी । ऐकोनि विकळ सुंदरी ॥३॥मूर्च्छा सांवरोनि ते अवसरीं । जानकी शोकातें आदरी ।कपाळ पिटी निजकरीं । धावें त्रिपुरारी आकांतीं ये ॥४॥धरणिजा म्हणे ऋषि ताता । मी काय करुं जी आतां ।वेगीं सोडवा माझ्या सुता । पुत्रदानता करावी ॥५॥माझा वनवासींचा सांगती । याचेनि होतें वनाप्रती ।काय कोपला शैलजापती ।