रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 66

  • 2.6k
  • 729

अध्याय 66 लवाला पकडले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ येरीकडे श्रीरामाचा वारू । निघाला भूमीवरी नव्हे स्थिरू ।चालतां हेलावे सागरू । तेजें दिनकरु लोपला ॥१॥तेजें हीन दशेचा प्रांत । वारुतेजें लखलखित ।अंगभारें गजगती चालत । जेंवी आदित्य पूर्वेसी ॥२॥मागे दळभार अगणित । सांगातें वीर अपरिमित ।शत्रुघ्न आणि भरत । समवेत निघाले ॥३॥मार्गीं राखितां ठायीं ठायीं । उल्लंघिले देश नाना पाहीं ।ऐसें क्रमोनि वनें घोर महीं । वाल्मीकाश्रमा वारु आला ॥४॥तेथें झाला चमत्कार । वना गेला होता कुश कुमर ।आश्रमीं लहु परम शूर । मातेजवळी खेळत असे ॥५॥ लवाने अश्वमेधाचा घोडा पकडला : तेथें जाहली नवलपरी । लहु खेळतां निघाला बाहेरी ।तंव