रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 64

  • 2.8k
  • 777

अध्याय 64 ऐल राजाची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसी शक्रारिहत्यांची कथा । अति आश्चर्य अपूर्वता ।ऐकोनियां समस्तां । झाला बोलता श्रीराम ॥१॥होवोनि आनंदभरित । बोलावयाचा उपक्रम करित ।पूर्वी कर्दम प्रजापतीचा सुत । ऐलनामें प्रसिद्ध ॥२॥तेणें भुजबळेंकरुन । पृथ्वीचें नृप जिंतोन ।स्वधर्मे राज्य करी जाण । प्रजापाळण पुत्रापरी ॥३॥आंगवण सुरेशाहुनि आगळी । उदारते न तुळती कर्ण बळी ।दैत्य दानवें भेणें पाताळीं । लंघोनि गेली तळातळा ॥४॥नाना गंधर्व असुर । भेणें पूजिती नृपेश्वर ।रायाचा पराक्रम देखोनि थोर । चरणा शरण अरी येती ॥५॥तो कोणे एकेकाळीं पारधीलागून । ससैन अटवी प्रवेशोन ।मृगां मारोनि लक्षावधि जाण । आणी श्वापदें नेणों किती ॥६॥जिकडे जाय