रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 58

  • 2.9k
  • 1k

अध्याय 58 शत्रुघ्नाला राज्याभिषेक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम म्हणे भार्गवासी । मधूचा पुत्र लवणासूर नामेंसीं ।कोण कर्म करी कोठें क्रीडेसीं । कोणें देशीं विचरतसे ॥१॥ऐकोनि श्रीरामाचें वचन । आनंदयुक्त समस्त जन ।तयांत भार्गव समूळ कथन । सांगता होय ते समयीं ॥२॥ सर्व प्राण्यांना भक्षण करणारा लवणासुर : लवणासुराची समूळ विवंचना । ऐकें गां पद्माक्षीरमणा ।मधुकुळीं जन्मोनि जाण । नाना प्राणी भक्षितो ॥३॥विशेषेंकरोनि तापस । लवणासुर भक्षितो सावकाश ।रुद्रकर्म तोचि आचार त्यास । नित्य क्रीडेसी मधुवचन ॥४॥सहस्त्रें सहस्त्र मारोनी । व्याघ्रमृगादिक प्राणी ।मानवें भक्षोनि आव्हानी । कर्मक्रिया करितसे ॥५॥जैसा प्रळयकाळींचा काळ । भक्षितसे जीवजाळ ।तैसा लवणासुर केवळ । प्राणिमात्रां अंतक