रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 56

  • 2.8k
  • 1k

अध्याय 56 ययातीची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वसिष्ठनिमिचें कथन । ऐकोनियां लक्ष्मण ।पुढें कैसे शापमोचन । झालें जी रघुनंदना ॥१॥श्रीराम म्हणे गा सौमित्रा । पुढील अपूर्व रसाळ कथा ।ते सांगेन सावधान श्रोता । दृढ चित्ता देइजे ॥२॥वसिष्ठनिमींचें आख्यान । अतिहास पुरातन ।वरुणवीर्य अति दारुण । घटामाजी निक्षेपिलें ॥३॥दिवसेंदिवस वाढोन । तयाचा झाला मैत्रावरुण ।तयासि अगस्ति ऐसें अभिधान । कुंभोद्भव म्हणती पंडित ॥४॥आतां निमिरायाची स्थिती । सावधान ऐकें उर्मिलापती ।शाप झाला कैसा मागुती । उःशापातें पावला ॥५॥वसिष्ठाचे शापेंकरुन । निमीनें देह न सांडितां जाण ।आणिक देहीं प्रवेशोन । नयनीं प्राण ठेविले ॥६॥वंशाचें करावया हित । काय करी प्रतापवंत ।यज्ञ करोनि