रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 50

  • 2.8k
  • 957

अध्याय 50 लक्ष्मण-सुमंत-संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ येरीकडे कथासंबंधु । रावणारीचा कनिष्ठ बंधु ।नामें लक्ष्मण प्रतापी प्रसिद्ध । राक्षसांचा कंदु छेदक ॥१॥ऋषिआश्रमीं मैथिली । प्रवेशली दुःखित ते काळीं ।तिचेनि शोकें आतुर्बळी । महा दुःख पावला ॥२॥हीन दीन मुखकमळ । कोमाइलें जैसें कर्दळीफळ ।सीतेचा देखोनि शोक सबळ । अति तळमळ करीतसे ॥३॥ सुमंताजवळ लक्ष्मणाने जानकीवियोगाचे दुःख सांगितले : श्रीरामसारथ्या पाहें येथ । श्रीरामासी हे दुःख होईल प्रप्त ।सीता पतिव्रता जाण निश्चित । वृथा ज्येष्ठें त्यागिली ॥४॥श्रीराम येथें असता । तयासी सीतेचा शोक कळता ।राघवावीण एवढ्या अनर्था । आजि म्यां दृष्टीं देखिलें ॥५॥सुमंता प्रारब्धाचा महिमा । यासी अन्यथा करुं न शके ब्रह्मा