रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 49

  • 2.4k
  • 774

अध्याय 49 सीता व वाल्मीकी भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऋषिपुत्रांकडून सीता दृष्टीस पडल्याची वाल्मीकींना वार्ता कळते : सीता वनीं हिंडतां ऐकली । शोक करितीं ऋषिपुत्रीं देखिली ।ते समस्त येवोनि वाल्मीकाजवळी । नमस्कार करिते पैं झाले ॥१॥ते समस्तही मधुरवचनीं । अहो जी ब्रह्मात्मजशिष्या वाल्मीकमुनी ।अपूर्व एक देखिलें नयनीं । एक स्त्री रुदन करितसे ॥२॥रुपें तरी मन्मथजननी । सुंदर सुकुमार दीर्घस्वनीं ।रुदन करितसे वनीं । अभिप्राय मुनि न कळे तिचा ॥३॥ नैव देवी न गंधर्वी नासुरी नच किन्नरी ॥एवं रुपा मया नारी दृष्टपूर्वा महीतले ॥१॥ नव्हे देवांची देवता । नव्हे गंधर्वांची कांता ।नव्हे असुरांची वनिता । किन्नरयोषिता ते नव्हे ॥४॥नव्हे जळींची