रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 46

  • 2.6k
  • 879

अध्याय 46 सीतेचे वनांत गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तदनंतर सुमित्रात्मज । रजनी क्रमोनी गभस्ती तेजःपुंज ।उदयो होतां जे वदला अग्रज । तया कार्या करितसे ॥१॥सुमंताप्रति बोले वचन । मुख कोमाईलें दिसे विवर्ण ।सारथियासहित रथ उत्तम जाण । येथें शीघ्र आणावा ॥२॥श्रीरामाची आज्ञा ऐसी । रथीं वाहोन जानकीसी ।सीतेचेही आवडी मानसीं । ऋषिआश्रम पहावे ॥३॥मी नेतो वैदेहीतें । पहावया ऋषिआश्रम पुण्यतीर्थे ।तरी सुमंता शीघ्र रथातें । आणावें आज्ञेकरोनी ॥४॥ लक्ष्मणाच्या आज्ञेप्रमाणे सुमंताने रथ आणलाः ऐकोनि लक्ष्मणाचे वचन । तत्काळ सुमंतें उठोन ।रथ आणिला रत्नखचित सुवर्णवर्ण । देदीप्यमान तेजस्वी ॥५॥सुमंत म्हणे सुमित्रात्मजा । रथ आणिला कुलजा ।आतां करावें योजिलें काजा ।