रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 40

  • 2.5k
  • 873

अध्याय 40 वानरांचे स्वदेशी गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामांकडून सुग्रीवाची प्रशंसा व त्याची पाठवणी : तदनंतर ऋक्ष वानर-राक्षस । अयोध्येसीं आनंदें बहुवस ।क्रमिला तेथें एक मास । सुखउल्हास सर्वांसी ॥१॥वानररावो जो भूपती । तयाप्रति बोले श्रीरघुपती ।तुझे उपकार आठवितां चित्तीं । थोर सुख होतसे ॥२॥तुझेनि संगें वानर । मिळाले गा अपरंपार ।तुझेनि मज सीता सुंदर । प्राप्त झाली किष्किंधेशा ॥३॥तरी आतां आपुले नगरासी । वेगीं जावें किष्किंधेसी ।जे कां अटक देवां दैत्यांसी । काळाचें तिसी न चले कांहीं ॥४॥ऐसिया किष्किंधेप्रती । राज्य करीं गा वानरपती ।पाळीं प्रधान सेना संपत्तीं । निष्कंटक राज्य करीं ॥५॥ सुग्रीवाला उपदेश : महाबहो किष्किंधानाथा