अध्याय 39 वानर-राक्षसांना आनंद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम सच्चिदानंदघन । लीलावतार परम पावन ।खेळ खेळे विचित्र विंदान । विधात्या महिमान न कळे ज्याचें ॥१॥ऐसा तो रघुपती । भद्रासनीं अयोध्येप्रती ।बैसला जैसा नक्षत्रें भोवतीं । मध्यें चंद्र विराजे ॥२॥भोवतें राजे तपोधन । तेणें सभा प्रसन्नवदन ।बंदीजन करिती गुणवर्धन । गंधर्व गायन करिताती ॥३॥तदनंतर पूर्वी भरतें । राजे बोलाविले होते रणसाह्यार्थे ।ते विनविते झाले रघुपतीतें । स्वदेशातें जावया ॥४॥श्रीराम म्हणे रायांसी । तुम्हांसि भरतें रणसाह्यासी ।पाचारिलें परी तुमच्या प्रसादेंसी । आधींच रावण मारिला ॥५॥तरी आतां स्वदेशा जावें । मज मनीं आठवावें ।म्हणोनि प्रीतिपूर्वक गौरवें । राजयांची पूजा केली ॥६॥ऐशी करोनियां पूजा