रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 38

  • 2.9k
  • 924

अध्याय 38 राजांचे रामदर्शनार्थ आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ याप्रकारें अयोनिजारमण । भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण ।सद्गुरु वसिष्ठाचें करोनि सेवन । राज्यकार्य चालविती ॥१॥करितां श्रीरघुनाथा । कोणा नाहीं दैन्यवार्ता ।कोणा नाहीं दैन्य चिंता । राज्यीं असतां श्रीराम ॥२॥ जनकांचे श्रीरामांकडे आगमन : राज्यकार्य प्रजापाळण । रात्रंदिवस करी रघुनंदन ।तंव कोणें काळीं विदेह पूर्ण । श्रीरामदर्शना पैं आला ॥३॥नामविदेही रूपविदेही । देहीं पाहतां तोही विदेही ।विदेहासि देहचि नाहीं । विअदेहीं पाहीं कन्या ज्याची ॥४॥ऐसा तो विदेही जनक । आला ऐकोनि वैदेहीनायक ।पुढे येवोनि नमस्कार सम्यक । अति आदरें श्रीरामें केला ॥५॥श्रीराम म्हणॆ जी विदेहनृपती । तुमचेनि आम्हां यश कीर्ति ।तुमचेनि उप्रतेजें