रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 37

  • 2.4k
  • 714

अध्याय 37 श्रीरामगुण संकीर्तन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुखनिद्रित भास्करवंशभूषण । जेंवी शेषशयनीं नाराय़ण ।तृतीयभाग निशी क्रमोनि भृगुनंदन । पूर्वे आगमन पैं केलें ॥१॥सद्गुरु मावळला । तृतीयभाग रात्रीचा क्रमिला ।पुण्यपुरुषां चेवो झाल ।प्रातःस्मरामि करिते झाले ॥२॥सकळ जनां चेडरें झालें । रतिसुखांपासोनि सुटले ।मार्गस्थ मार्गीं लागले । तीर्थयात्रा करावया ॥३॥विप्रवेदाध्ययन करिती । गाई घरोघरीं दुभती ।एकी त्या दधिमथनीं प्रवर्तती । सारासार निवडोनि ॥४॥कागपक्षी चेडरे झाले । तमेंसी निशीणें प्रयाण केलें ।ऐसें जाणॊनि गंधर्व आले । श्रीरामांतें उठवावया ॥५॥करिती सुस्वरें गायन । वीणा वेणु वाद्यें गहन ।आलाप मूर्च्चना तान मान । सुरस गायन मांडिलें ॥६॥सर्व किन्नरांची गायनध्वनी । ऐकिली श्रीरामें शयनस्थानीं ।अति