रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 34

  • 2.2k
  • 714

अध्याय 34 ब्रह्मदेवाचे लंकेला आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वप्रसंगीं दशाननपुत्रें । धरोनि नेले इंद्रातें ।तें देखोनि सुरवर दुःखाते । पावले बहुत संग्रामीं ॥१॥समस्त सुरवर मिळोन । येवोनि प्रार्थिला चतुरानन ।म्हणती भ्रष्ट झालें अमरसदन । इंद्र धरून नेला लंकेसीं ॥२॥तुझिये वरदें राक्षस । उन्मत्त झाले बहुवस ।तेणें मेघनादें आम्हांसि देवोनि त्रास । लंके अमरेश शरून नेला ॥३॥ऐकोनि देवांचें वचन । आश्चर्य पावला चतुरानन ।मग समस्त देव मिळोन । लंकाभवन पावले ॥४॥ब्रह्मा आला ऐकोन वाणी । राक्षसराज सामोरा येवोनि ।पूजा अभिवंदने करोनि । मग ब्रह्मा मंदिरासी नेला ॥५॥रावण म्हणे जी स्वाभिनाथा । कोणीकडे आलेती समर्था ।येरू म्हणॆ तुझ्या पुत्राची प्रशंसता ।