रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 33

  • 2.3k
  • 759

अध्याय 33 रावणाची सुटका व इंद्रबंधन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची प्रतिज्ञा : राक्षसां देवा संग्राम घोर । हा रामा तुझ्या मायेचा बडिवार ।राक्षसदेवांच्या शरीं अंबर । भरुनी अंधकार दाटला ॥१॥कोणा कोणी न दिसे स्पष्ट । तम दाटलें अति उत्कृष्ट ।वीरें वीर पावले कष्ट । तयांत तिघे सावध ॥२॥एक राक्षस दुजा राजकुमर । तिजा इंद्र धनुर्वाडा दुर्धर ।परस्परें करिती रणमार । घाय दुर्धर हाणिती ॥३॥सारथिया म्हणे रावण । ऐकें गा तूं एक वचन ।माझे सकळ राक्षसगण । विबुधीं रणीं पाडिले ॥४॥आजि माझ्या क्रोधेंकरून । करीन त्रैलोक्याचें दहन ।सारथिया शीघ्र स्यंदन । नेईं सैन्याचे आदिअंतवरी ॥५॥शीघ्र आजि समरांगणीं । शत्रूंची धडें