रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 30

  • 2.3k
  • 783

अध्याय 30 रावणाला नलकुबेराचा शाप ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचे कैलासावरील उपवनांत आगमन : पौलस्तितनयचूडामणी । निशी मधुपुरीस क्रमोनी ।तदनंतरें कैलासाचे उपवनीं । अलकावतीसमीप आला ॥१॥देखोनि अग्रजाचें नगर । तेथें राहिला सहित निशाचर ।तंव अस्तमाना गेला भास्कर । प्रकट झाली शर्वरी ॥२॥क्षीराब्धिसुतें उदय केलियावरी । चांदणें प्रकटले अंबरीं ।दिशा धवळिल्या तेजेंकरीं । कैलासगिरी शोभला ॥३॥राक्षसवीर आतुर्बळी । शस्त्रें उसां घालोनि निद्रासमेळीं ।तंववरी सुरारि इकडे ते काळीं । वन न्याहाळीत पैं होता ॥४॥ चंदण्यात दिसणारे वनसौंदर्य : शैलपाठारींचे उपवन । आनंदवनाहूनि गहन ।चैत्रगहन अशोकवन । त्या समान पैं नव्हती ॥५॥नाना तरूंच्या याती । कण्हेर नाना वर्णांचें शोभती ।कदंब कुसुमें लागले असती