अध्याय 27 रावणाचे मुंडन करुन विटंबना ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वकथानुसंधान । धर्मराजा शीघ्र स्वर्गगमन ।समागमें नारद भगवान । देवसदन पावला ॥१॥येरीकडे पुरंदरारिजनक । राक्षासांमाजि श्रेष्ठ नायक ।पुष्पकीं आरुढोन लोकालोक । क्रमूनि रमातळा येता झाला ॥२॥घायीं राक्षस जर्जरीभूत । मार्गी एकमेकां उपचारित ।देवांमाजि बळी प्रेतनाथ । जिंतोनि त्यातें चालिला ॥३॥सवें प्रधान शुकसारण । मारीच अकंपन प्रहस्त जाण ।आणिकही बळियाढे गहन । देवदर्पहरण राक्षस ॥४॥ रावणाचे पाताळांतील भोगावती नगरीला आगमन : ऐसे प्रधानांसहित । पुष्पकारुढ लंकानाथ ।तंव पुढें रसातळ लोकांतें । देखते झाले राक्षस ॥५॥तया रसातळामाझारीं । वरुण नाग सहपरिवारीं ।आणिक दैत्य नानापरी । वसती तया नगरीं हो ॥६॥तया नगरीचें अभिधान