रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 23

  • 2.6k
  • 828

अध्याय 23 वाली- रावणाचे सख्य ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रणी धरोनि रावण । सहस्त्रार्जुनें केलें बंधन ।तेथें पुलस्ति मुनि येऊन । मागोनि दशानन सोडविला ॥१॥पुलस्ति गेला स्वर्गासी । मागें रावण विचरे अवनीसीं ।जे जे राजे जे जे देशीं । त्या त्या स्थाळासी आपण जाये ॥२॥तयांते जिंती रावण । राक्षस अथवा राजे जाण ।अथवा देव सिद्ध चारण । अधिक बळ ऐकोन संग्राम करी ॥३॥ रावणाचे किष्किंधेला आगमन : तदनंतरे लंकानाथ । हिंडत असतां प्रधानांसमवेत ।तंव पुढें किष्किंधेचा प्रांत । देखोनि त्वरित तेथे आला ॥४॥तें किष्किंधा नगरी कैसी । दुसरी अमरावती ऐसी ।पुरंदरात्मज पाळी जियेसी । वर्णना तिसी न करवे ॥५॥भोंवती नाना