रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 18

  • 2.6k
  • 732

अध्याय 18 रावणाचे राजा मरूत्ताच्या यज्ञाला जाणे ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मरूत्त राजाच्या यज्ञाला रावणाचे आगमन : वेदवतीचें अग्निप्रवेशन । तें देखोनि दशानन ।पुष्पकीं आरूढोन पर्यटन । करिता झाला मेदनीतें ॥१॥तदनंतरें मरूत्त भूपती । यज्ञ करीत होता उशीरपर्वतीं ।मिळाले ऋषि देवपंक्तीं । मंत्राहुती घालीत होते ॥२॥देवगुरूचा बंधु जाण । संवर्तनामें तो ब्राह्मण ।जयाचें ज्ञान बृहस्पतिसमान । आचार्य पूर्ण यज्ञींचा ॥३॥समस्त द्विजांसहित । होम करी राजा मरूत्त ।तंव रावण देखिला येत । वरदोन्मत्त होवोनी ॥४॥वरदानाचेंनि बळें । त्रैलोक्य जिंतीत चालिला सकळें ।तें देखोनि द्विजदेवकुळें । अत्यंत भय पावलीं ॥५॥ रावणभयाने देवांनी निराळ्या योनींत प्रवेश केला : तदनंतरे श्रीरघुपती । देव आणिक