रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 17

  • 2.1k
  • 720

अध्याय 17 वेदवतीचे आख्यान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अगस्ति जो महामुनी । कथा सांगे श्रीरामा लागूनी ।ते कथा सुरस भवनाशिनी । सावधान श्रवणीं ऐकावी ॥१॥रावण विचरतां महीतळीं । हिमाद्रीच्या वनस्थळीं ।समवेत प्रधान बळी । राक्षस न्याहाळी भूमंडळ ॥२॥ लंकेला जाताना रावणाला सुकुमार कन्येचे दर्शन : प्रधानांसमवेत दशानन । पुष्पकावरी आरूढोन ।उल्लंघितां वनोपवन । हिमवंतासमीप आला ॥३॥पुढें देखिलें कन्यारत्न । सुरस सुकुमार कमलनयन ।मस्तकीं जटा कृष्णाजिन । तापसवेषें शोभली ॥४॥विधिपूर्वक अनुष्ठान । जैसें करिती ऋषि देवगण ।तैसी ते सुंदरी पूर्ण । तपें दारूण तपतसे ॥५॥रावणें देखतां कन्यारत्न । सुशील सुव्रत गूनसंपन्न ।काममोहित भ्रांत होऊन । हास्यवदनें पुसता झाला ॥६॥अवो भद्रें अवधारीं