रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 16

  • 2.7k
  • 960

अध्याय 16 शंकराचे रावणाला वरदान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मागिले प्रसंगीं वैश्रवण । रणभूमीस झाला भग्न ।मागें रावणें पुष्पक हिरोन । वरी आरूढोन निघाला ॥१॥सवें प्रधान थोर थोर । मारीच प्रहस्त महावीर ।विमानीं आरूढोन वनें घोर । लंघिते झाले ते काळीं ॥२॥षडाननाचें जन्मस्थान । ते देखिलें शरवण वन ।तेथें शर होती उत्पन्न । यालागीं शरवण बोलिजे ॥३॥तदनंतरे पौलिस्तिकुमर । देता झाला वन सुंदर ।वृक्ष वल्ली अपार । अति मनोहर देखिलें ॥४॥तेजें अत्यंत साजिरें । सुवर्णमयचि साकारें ।उपमा देतां भास्करें । किरणाजाळ सोडिलें ॥५॥तया वनप्रदेशीं कैलासगिरी । असे जैसा मेरू धरित्रीं ।त्याच भागीं शोभा साजिरी । पुष्पक तेथें येतें झालें ॥६॥