रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 14

  • 2.3k
  • 1k

अध्याय 14 रावणसैन्याचा विध्वंस ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावण आपल्या चतुरंग सैन्यासह अलकावती नगरीला पोचला : पूर्वप्रसंगीं रावण । रथावरी आरूढोन ।सवें सेना प्रधान । जेथें वैश्रवण तेथें आला ॥१॥तदनंतरें विबुधारीं । चालिला अतिक्रोधेंकरीं ।समवेत प्रधान साही भारी । ब्रह्मांड उलथिती पैं ऐसे ॥२॥तयांची नांवे कोण कोण । मारीच महादेव प्रहस्त शुक सारण ।सहावा धुम्राक्ष ऐसे जाण । संग्रामीं बळ दारूण ज्यांचें ॥३॥जयांच्या पुरूषार्थापुढें । रावण कोणासी नातुडे ।जैसे साही ऋतु गाढे । आपुलेनि काळे शोभती॥४॥तेही साही प्रधान कैसे । क्रोधें सृष्टि जाळिती ऐसे ।चालिले अति आवेशें । नद्या पर्वत उल्लंघिती ॥५॥पुरें पाटणें ग्राम नगरें । लंघित वने उपवनें थोरें