रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 13

  • 2.5k
  • 909

अध्याय 13 रावणाचे अलकावतीस गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तदनंतरें ब्रह्मलोकगुरू । रावणासि देवोन वरू ।केला लंकेचा ईश्वरू । दोघां बंधूसमवेत ॥१॥तिघांसि पाणिग्रहण झालें । रावणासी राज्य लाधलें ।मेघनादाचें जनन सांगितलें । पुढील कथा अवधारा ॥२॥राज्य करितां विबुधारिजनक । प्रजालोक स्वस्थ सकळिक ।कोणी एके काळीं घटश्रोत्र देख । विनविता झाला बंधूसी ॥३॥अहो जी नृपति अवधारीं । तुम्हीं ज्येष्ठ बंधू आहां शिरीं ।मज निद्रा बाधी भारी । काळकूटासमान ॥४॥ मागणीप्रमाणे कुंभकर्णाला झोपण्यासठी रावणाने मंदिर बांधून दिले : निद्रा बाधीतसे राजेंद्रा । आवडी नाहीं भोगापचारां ।मजकारणें धाम करा । सुखशयन करावया ॥५॥ऐकोनि अनुजाचें वचन । रावण हांसिला खदखदून ।विश्वकर्मा मग पाचारोन ।