रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 11

  • 3.3k
  • 915

अध्याय 11 रावणाला लंकेची प्राप्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुमाळी व इतर प्रमुख राक्षसची रावणाला प्रार्थना : पूर्वप्रसंगीं श्रीरघुपती । रावणासी झाली वरदोक्ती ।तें जाणोनि सुमाळी निश्चितीं । अभय चित्तीं समाधान ॥१॥उठोनि समस्त रजनीचर । मारीच प्रहस्त विरुपाक्ष महोदर ।आणिक प्रधान थोर थोर । येते झाले समस्तही ॥२॥सुमाळी समस्त राक्षसेंसीं । येता झाला रावणापसीं ।काय बोलिला तयासी । सावधानेंसीं अवधारा ॥३॥अगा दशग्रीवा महावीरा । तपोबळेंकरुनि चतुरा ।पावलासी प्रकारा । परमोदरा रावणा ॥४॥तूं त्रिभुवनीं श्रेष्ठ राक्षस । पावलासी उत्तम वरास ।विष्णुभय पावलों त्रास । लंका त्यजूनि रसातळा देलों ॥५॥महाबहो तेह्तें गेलों । तेथें असतां विष्णुभय पावलों ।थोर संग्रामीं भग्न झालों ।