रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 7

  • 4.7k
  • 720

अध्याय 7 माळी राक्षसाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वसंगीं रजनीचरीं । वेढियला तो श्रीहरी ।पुढें वर्तलें तें चतुरीं । सावधान ऐकावें ॥१॥श्रीहरि पर्वतासमान । राक्षस तेथें मेहुडे जाण ।श्रीहरी सुटलिया प्रभंजन । दणादाण राक्षसमेघां ॥२॥अवकाळींचा पर्जन्य । बळेंविण करी गर्जन ।तैसे राक्षस बळहीन । संग्रामा जाण प्रवर्तले ॥३॥जैसे टोळ आकाशीं । पसरती दशदिशीं ।ते टोळ वृक्ष देखोनि मानसीं । उल्लासेंसी वेढिती ॥४॥जेंवी मशक पर्वतमाथां । असंख्य बैसती तत्वतां ।परी तो भार पर्वतचित्ता । अणुमात्र उपजेना ॥५॥जैसे मत्स्य सागरीं । क्रीडताती सहपरिवारीं ।ते पारधी आकळी जाळियाभीतरीं । तैसें श्रीहरि करूं पाहे ॥६॥ परस्परांचे तुंबळ युद्ध : त्या राक्षसांचे अमोघ बाण