रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 5

  • 2.3k
  • 822

अध्याय 5 सुमाली, माल्यवंत व माली यांची जन्मकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणारि म्हणे अगस्ती । तुझेनि मुखें सुकेश उत्पत्ती ।वर लाधला शैलजात्मजापती । महादेवें प्रीतीं पाळिला ॥१॥तयाकारणें वस्तीसी । गंधर्व लोक यमपुरासीं ।राज्यीं स्थापोनि तयासी । पुढें काय ऋषी वर्तलें ॥२॥तें सांगावें आम्हांप्रती । तूं कृपाळु कृपामूर्ती ।तुजसमान नाहीं त्रिजगतीं । तुझी कीर्तीं न वर्णवे ॥३॥तुवां प्रशिला अपांपती । तुझेनि विंध्याद्रीसी निद्रास्थिती ।तुझेनि सूर्यास मार्गप्राप्ती । तुवां इल्वकवातापी मारिला ॥४॥ऐसा तुझा अगाध महिमा । वाचा वर्णूं व शके ब्रह्मा ।परादि वाचा शिणल्या मज रामा । वर्णिले तुम्हां न वचे ॥५॥ राक्षसवंशासंबंधी रामांचा अगस्तींना प्रश्न : यालगीं जी ऋषिवर्या ।