अध्याय 4 सुकेशाची जन्मकथा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीविष्णूंनी रावणाचा वध का केला असा रामांचा अगस्तिमुनींना प्रश्न : ऐकोनि अगस्तीचें वचन । कर जोडोनि रघुनंदन ।विनीतवृत्तीं करोनि नमन । काय आपण बोलत ॥१॥अगा ये अगस्ति महामुनी । पूर्वी लंकादुर्गभवनीं ।राक्षस वसती हें तुमच्या वचनीं । आजि म्यां श्रवणीं ऐकिलें ॥२॥ब्रह्मादिकांचा नियंता । चराचर वर्ते ज्याचिये सत्ता ।यज्ञरूप जो अयोनिजेचा भर्ता । डोलवी माथा ऋषिवाक्यें ॥३॥कुंभोद्भवाच्या वचनासी । ऐकोनि विस्मय श्रीरामासी ।म्हणे स्वामी मांसभक्षक कपटवेषी । राक्षस लंकेसीं वर्तती ॥४॥पुलस्तिवंशीं राक्षस झाले । हें तुमचेनि मुखें ऐकिलें ।रावणकुंभकर्ण जन्मले । प्रहस्तादि विकटादिक ॥५॥आणि रावणाचे सुत । होते पराक्रमवंत ।याहूनि ते राक्षस