कमळी

  • 7.4k
  • 1
  • 2.6k

खरंच एक हृदय स्पर्शी दुःखमय सत्य घटना..! गेली ती आज.. ! मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली..! तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुंदका आवरेना, पण शेवटी ती सुद्धा स्त्रीच तर आहे. बाहेर पडू पाहणारा हुंदका साडीच्या पदराच्या बोचक्याखाली दाबून धरावा लागला. धावत जावून लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणनारे पाय अंगठ्याने जमीन कोरु लागले, पण डोळ्यांना मात्र बांध घाळता आला नाही ते ओसंडून वाहत होते. कित्येक असे अन्यायी बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते मायच्या डोळ्यांनी.. कित्येक दुःख पचविले देखील होते. पण सगळे सगळे पडद्या आडून. पुरुषी प्रस्थापित समाजात हेच स्त्रियांचं जगणं; मी का सांगितले नाही पोरीला, 'स्त्री जातीला स्वेच्छेने मरणाचा