रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 92

  • 3k
  • 1.1k

अध्याय 92 श्रीरामचरित्र – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामसभेचे वर्णन : यानंतरें दुसरे दिवशी । करोनियां प्रातःस्नानासी ।वंदोनियां महर्षींसी । भद्रपीठासीं श्रीराम आला ॥ १ ॥सभा बैसली घनदाट । दुजे उपमेसी वैकुंठ ।तेथींचा महिमा उत्कट । अति श्रेष्ठ रामसभा ॥ २ ॥अंकीं घेवोनि जनकनंदिनी । श्रीराम बैसला सिंहासनीं ।येवोनि भरतादि प्रधानीं । लोटांगणी वंदिला ॥ ३ ॥छत्र धरिलें सुमंतें । अकोपन घरी चामरातें ।राष्ट्रवर्धन धरी व्यजनातें । आतपत्रातें धर्मपाळ ॥ ४ ॥रामचरणांनिकट भरत । उभा राहे जोडोनि हात ।तो युवराजा अति विख्यात । नम्र विनीत भावार्थी ॥ ५ ॥हाती धरोनि धनुष्यबाण । सव्य भागीं लक्ष्मण ।उभा राहोनि विचक्षण । श्रीरामचरण