रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 91

  • 2.6k
  • 930

अध्याय 91 वानरांचे स्वस्थानी निर्याण – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सिंहासनांधीश श्रीरामांचे वर्णन : तदुपरी दुसरें दिवशीं । करोनियां प्रातःस्नानासी ।वंदोनियां महेशासी । भद्रपीठासी श्रीराम आला ॥ १ ॥सभा झाली घनदाट । प्रत्यया न ये वैकुंठ ।येथींचा महिमा उद्‌भट । डोळा स्पष्ट विश्व देखे ॥ २ ॥अंकीं बैसवोनि जानकीसी । आपण बैसला सिंहासनासीं ।घेवोनि भरत प्रधानासी । बंधुत्रयेंसीं नमिता झाला ॥ ३ ॥सुमंत धरी छत्रातें । राष्ट्रवर्धन धरी व्यजनातें ।धर्मपाळ आतपत्रातें । धरितां झाला ते काळीं ॥ ४ ॥भरत चरणीं निकट । यौवराज्य लाहोनि उत्कृष्ट ।नम्रपणे बोले चोखट । राजनीतिलागूनी ॥ ५ ॥धनुष्य खड्‌ग हातीं धरून । सव्यभागीं लक्ष्मण ।उभा