रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 89

  • 2.9k
  • 948

अध्याय 89 हनुमंताचे रामप्रेमाचे वर्णन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांनी हनुमंताची स्तुती करून त्याला वरदान देण्याची इच्छा दर्शविली : धन्य हनुम्याचा भावार्थ । धन्य हनुम्याचा पुरुषार्थ ।धन्य हनुम्याचा सिद्धार्थ । जेणें रघुनाथ वोळला ॥ १ ॥न मागतांही निश्चयेंसीं । माग म्हणे आवडीसीं ।निजदासीं कृपा ऐसी । हर्षे त्यासी मग म्हणे ॥ २ ॥ प्रसन्नो हि हतूमंतमुवाच रघुनन्दनः ।वरं वृणीष्व चाद्य त्वं महत्कार्य कृतं त्वयां ॥ १ ॥ तुझिया महत्कार्याची कथा । वाचे न बोलवे सर्वथा ।तुझा ऋणी मी हनुमंता । जाण तत्वतां निश्चये ॥ ३ ॥काय अपेक्षी तुझें चित्त । जें दुष्प्राष्य त्रैलोक्यांत ।तें तें मागावें निश्चित । कृपा