रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 87

  • 3k
  • 981

अध्याय 87 हनुमंताचे लीलाचरित्र – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांकडून सर्वांचा सन्मान : ब्रह्मादि लोकपाळांसी । रामें गौरविले सकळांसी ।पुढें बिभीषण सुग्रीवादिकांसी । राम निजगणांसी पूजित ॥ १ ॥निजगणांची प्रीति पूर्ण । आवडी त्याचें पूजाविधान ।स्वयें करीत रघुनंदन । ऐका विवंचन तयाचे ॥ २ ॥देवभक्तांचें प्रेम गहन । त्यांचें पूजेचें विधान ।वदावयामज कैचें वदन । हीन दीन मतिमंद ॥ ३ ॥तथापि श्रीरामकृपेची ख्याती । वनचर मर्कट हाती ।धरोनियां अपांपती । बांधिला निश्चिती पाषार्णी ॥४ ॥निरायुधें माकडें । ती पाडिती लंकेचे हुडे ।दशमुख केलें वेडें । घेतलें कैवाडें त्रिकूट क्षणें ॥ ५ ॥सागरी दगड तरती । पालेखाईर सुरकार्यार्थी ।तिही राक्षय नेले