रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 86

  • 2.5k
  • 771

अध्याय 86 भरताला अभिषेक – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामें प्रार्थितां बहुत रीतीं । राज्य न घेचि ऊर्मिलापती ।तेणें तटस्थ सुरपंक्ती । वानर चित्तीं विस्मित ॥ १ ॥ सर्वात्मना पर्यनुनीयमानो यदा न सौमित्रिरुपैति योगम् ।नियुज्यमाजो भुवि यौवराज्ये ततोऽभ्यषिंचत्‌भरतं महात्मा ॥ १ ॥ यौवराज्यपद स्वीकारण्याची भरताला सर्वांची विनंती : भरत शत्रुघ्न बिभीषण । सुग्रीवादि वानरगण ।इंद्रब्रह्मादि सुरगण । प्रार्थितां लक्ष्मण राज्य न घे ॥ २ ॥वसिष्ठादि रघुपती । तिही प्रार्थिला बहुत रीतीं ।राज्य न घे ऊर्मिलापती । विस्मित चित्तीं सुरसिद्ध ॥ ३ ॥तेणें काळें भरतासी । सकळीं प्राथिलें प्रीतीसीं ।सौमित्र न घे यौवराज्यासी । तूं विनंतीसी अंगीकारीं ॥ ४ ॥ त्यामुळे